तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पालकांनी केला 'हा' आरोप

तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पालकांनी केला 'हा' आरोप

निमगाव खैरी l वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तळ्यात एका अल्पवयीन मुलीचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला. उशिराने या मुलीचा मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात आला.

तालुक्यातील निमगाव खैरी येथील तळ्यात काल दुपारी 11 वाजेच्या दरम्यान एक मृतदेह आढळून आला. मात्र हा मृतदेह कोणाचा हे कोणालाच सांगता येत नव्हते. सदरचा मृतदेह कुजलेला असल्याने दुर्गंधी सुटलेली होती. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर हा मृतदेह स्त्री जातीचे असल्याचे निष्पन्न झाले.

तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पालकांनी केला 'हा' आरोप
सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्‍न; चिठ्ठी लिहून घेतले विष

सदरची मुलगी ही गावातीलच असल्याची ओळख पटली. ती 3 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाली होती, असे सांगण्यात आले. तसेच तिच्या कानातील रिंगमुळे तिच्या वडिलांनी तिला ओखळले. या तळ्याजवळ एका पुरुषाचा गॉगल आढळून आला आहे. तसेच तिचे सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा घातपात झाला असून तिला मारुन टाकण्यात आले असल्याचे सांगितले. सदरचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी श्रीरामपूर येथे पाठविण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

तळ्यात आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; पालकांनी केला 'हा' आरोप
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह ९ जणांविरोधात गुन्हा

Related Stories

No stories found.