घुमनदेव परिसराला वादळाचा तडाखा

वीज तारांवर झाडे पडली, वीज गायब
घुमनदेव परिसराला वादळाचा तडाखा

टाकळीभान (वार्ताहर)

श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील घुमनदेव परीसराला काल वादळी वार्‍याने चांगलाच तडाखा दिला.

भोकर ते घुमनदेव रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडुन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तर काही ठिकाणी झाडे विजेच्या तारांवर पडल्याने विजेचे खांब वाकून तारा तुटल्याने परीसरातील वीज गायब झाली.

परीसरात मान्सूनचे आगमन झाले नसले तरी गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पूर्वभागात पावसाला सुरवात झाली होती. काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. घुमनदेव फरीसरात मात्र जोराचे वादळ झाले.

वादळामुळे भोकर ते घुमनदेव रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली. झाडे पडल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक बंद झाली होती.काही ठिकाणी मोठी झाडे रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर पडल्याने अनेक ठिकाणी तारा तुटून खांब वाकल्याने वीज पुरवठा बंद झाला होता. रस्त्यावर पडलेली झाडे बाजुला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तरुण सहकार्य करीत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com