श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव रस्ता ऑगस्ट अखेर खड्डेमुक्त न झाल्यास प्रहारस्टाईल आंदोलन

सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव रस्ता ऑगस्ट अखेर खड्डेमुक्त न झाल्यास प्रहारस्टाईल आंदोलन

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव महामार्गावर खड्डेच खड्डे झाले असून हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठीं ऑगस्ट अखेर पर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागात प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक महादेव आव्हाड, प्रहार धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते, नेवासा तालुका सरचिटणीस जालिंदर आरगडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले की, श्रीरामपुर-नेवासा-शेवगाव महामार्गावर खड्डे पडून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खराब झाल्या आहेत. हा रस्ता असाच पुढे शेवगावपर्यंत पूर्णपणे खराब झालेला आहे. याच रस्त्याने इतर वाहतुकीसोबत मोठ्या प्रमाणात सात ते आठ साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सुरू असते.त्या काळात अपघाताचे प्रमाण वाढत असते. तालुक्यात सुरु असलेल्या रस्त्याच्या अनेक कामांची चौकशी करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.

ऑगस्टअखेर पर्यंत श्रीरामपूर-शेवगाव रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाची राहील असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com