वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी

वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

चार चाकी वाहनाने धडक (Accident) दिल्याने एका महिलेसह तिघे गंभीर जखमी (Injured) झाले. श्रीरामपूर नेवासा रोडवरील (Shrirampur Newasa Road) हरेगाव फाटा (Haregav Phata) पोलीस चौकी जवळील भाटीयानी पेट्रोल पंपासमोर हे घटना घडली.

वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी
उद्धवजींचा राजीनामा घेण्यासाठी रात्री साडेदहापर्यंत ते जागे होते..!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर नेवासा रोडवरील (Shrirampur Newasa Road) असलेल्या भाटियानी पेट्रोल पंपासमोर महिला (Woman) व पुरुष पिण्यासाठी पाणी आणत असताना एका भरधाव वेगात आलेल्या स्विप्ट व्हिडीआयच्या वाहन चालकाने (क्र. एमएच 20 डिजे 3621) त्यांना जोराची धडक (Accident) दिली. त्यात दोन महिला व एक पुरुष असे तिघे जण जखमी (Injured) झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. अपघातात (Accident) एक महिला गंभीर जखमी (Injured) झाली आहे. इतर दोघे किरकोळ जखमी झाले.

वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी
नगर जिल्ह्याला 57 लाखांचा निधी

यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सदर जखमींना उपचारासाठी श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. तसेच घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर शहर पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावेळी सदर वाहनचालक भरधाव वेगात वाहन चालवत श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन (Shrirampur Police Station) येथे स्वतः हुन दाखल झाला. यावेळी प्रत्यक्षदर्शी नागरीकांनी माहिती वर्णन करत असताना वाहनचालक भरधाव वेगात असल्याची माहिती दिली.

वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी
समृध्दी महामार्गावर कारचा विचित्र अपघात

यावेळी पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष परदेशी, पालीसे काँन्स्टेबल तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमीना वैद्यकिय उपचार सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी
दोन ट्रकच्या अपघातात वृध्देसह दोघांचा मृत्यू; एक जखमी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com