श्रीरामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ना. चंद्रकांत पाटील यांचा निषेध

श्रीरामपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ना. चंद्रकांत पाटील यांचा निषेध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणार्‍या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व साईबाबा संस्थानच्या माजी विश्वस्त व माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला.

यावेळी आदिक म्हणाल्या, महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दर्‍यांमध्ये राहणार्‍या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मविरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. कंपनीमध्ये केलेल्या कामाच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, किर्लोस्कर कंपनीतील शेअर्स, आई-वडिलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले 100 तोळे सोने, मंगळसूत्रही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले.

महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज हे कर्मविरांचे आदर्श होते. याच कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही कर्मविरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून ज्ञानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले, या पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा निषेध करण्यात येत आहे.

यावेळी सुनील थोरात, अर्चना पानसरे, दीपक कुर्‍हाडे, बापूसाहेब पटारे, जयंत चौधरी, सोहेल शेख, प्रियंका जनवेजा, हंसराज आदिक, किशोर पाटील, सतीश गवारे, रंगनाथ माने, शामराव तर्‍हाळ, राजेंद्र पानसरे, पोपटराव आदिक, सुधाकर बोंबले, जाकीर बागवान, भास्करराव ताके, अशोकराव पटारे, डॉ. रविंद्र जगधने, नाना गांगड, तोफिक शेख, सैफ शेख, गणेश ठाणगे, सुधाकर अडांगळे, गोपाल वायदेशकर, शुभम पवार, अनिरुद्ध भिंगारवाला, अर्जुन आदिक, कलीम बिनसाद, अरबाज शहा, रोनीत घोरपडे, सुमित मुथा, प्रशांत खंडागळे, दीपक निंबाळकर, सागर कुर्‍हाडे, भैय्या भिसे, सुनील मोरे, अभिषेक गुलदगड आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com