श्रीरामपूर नगरपालिकेने एका दिवसात केली 45 लाख रुपयांची कर वसुली

श्रीरामपूर नगरपालिकेने एका दिवसात केली 45 लाख रुपयांची कर वसुली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेकडून शहरातील विविध भागात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीदार यांच्यावर तीव्र कारवाई करत एका दिवसात तब्बल 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक वसुली झाली असल्याचा दावा वसुली अधिकार्‍यांनी केला आहे.

काल एका दिवसात शहरातील विविध ठिकाणी थकबाकीपोटी नळ कनेक्शन कट करणे, गाळे, दुकाने सील करणे अशा प्रकारच्या कारवाया करत काल नगरपालिकेतर्फे चेकद्वारे व रोख असा एकूण 45 लाख रुपयांची वसुली केली आहे.

तरी शहरातील सर्व नळ कनेक्शनधारक व मालमत्ताधारक यांनी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे व होणारी कार्यवाही टाळावी, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

आपले 2021-2022 अखेर मालमत्तेवरील थकबाकी भरली नाही तर आपली नावे छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, दशमेश चौक, भगतसिंग चौक तसेच शहरातील इतर प्रमुख चौकांमध्ये प्रसिध्द करण्यात येतील. यामुळे कोणाची मानहानी झाल्यास त्याची जबाबदारी सदर थकबाकीदार यांच्यावरच राहील असेही सांगण्यात आले.

नगरपालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा ुुु.ीहळीर्रािीीाल.ेीस या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणा करण्यासाठी कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. तरी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com