श्रीरामपूर नगरपालिकेने आठवडे बाजाराचे योग्य नियोजन करावे - करण ससाणे

श्रीरामपूर नगरपालिकेने आठवडे बाजाराचे योग्य नियोजन करावे - करण ससाणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

सध्या करोनाची परिस्थिती भयंकर बनत चाललेली असून जनतेने सावधगिरीचे उपाय बाळगणे गरजेचे

आहे. यातच श्रीरामपूर नगरपालिकेने आठवडे बाजाराचे व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे गर्दी खूप वाढत चाललेली आहे. त्यामुळे नगरपालिकेने आठवडे बाजार भरविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.

तसेच पाटाच्या कडेला अनेक हॉस्पिटल आहेत त्यामुळे तेथे पेशंटची सतत वर्दळ असते. आणि त्याच रस्त्याला अनेक भाजीविक्रेते बसलेले असतात त्यामुळे या रस्त्याला खूप गर्दी होते. या गर्दीमुळे करोना पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, रस्त्यांवरच बाजार भरत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्याची कोरोना ची परिस्थिती बघता नगरपालिकेने आठवडी बाजाराचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे असे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com