श्रीरामपूर पालिकेचे 108 सेवानिवृत्त कर्मचारी उद्यापासून पालिकेसमोर उपोषणास बसणार

श्रीरामपूर पालिकेचे 108 सेवानिवृत्त कर्मचारी उद्यापासून पालिकेसमोर उपोषणास बसणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे 7 व्या वेतन आयोगानुसार थकीत फरक, उपदान, रजावेतन, कालबध्द पदोन्नतीचा फरक तसेच वेतन फरकाची रक्कम त्वरित मिळावी. अन्यथा आम्ही सर्व सेवानिवृत्त कर्मचारी दि. 27 सप्टेंबरपासून नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

पालिकेचे हे कर्मचारी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना 7 व्या वेतन आयोगानुसार उपदान फरक, रजा वेतन फरक, पेन्शन फरक, वेतन फरक, कालबध्द पदोन्नतीचा उपदान, रजा, पेन्शन आदी फरकाच्या थकीत रकमा अद्याप पावेतो देण्यात आलेल्या नाहीत. तसेच सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दोन महिने उशिराने 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. त्या दोन महिन्यांचा फरक देण्यात यावा.

महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिकांनी त्यांच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना उपरोक्त थकीत रकमा अदा केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या देय असलेल्या सर्व थकीत रकमा थकवू नयेत असे आदेशात नमूद असून थकीत रकमा मुदतीत अदा न केल्यास त्यावर व्याजासह रक्कम अदा करण्याचे आदेश आहेत. तरीही आम्ही आजपर्यंत केलेल्या एकाही अर्जाची काडीमात्र दखल घेतलेली नाही. त्यापैकी एकही रक्कम आजपावेतो अदा केलेली नाही.

तरी आमच्या उपरोक्त थकीत रकमा दि. 26 सप्टेंबर 2021 अखेर अदा कराव्यात, अन्यथा आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही वयोवृध्द सेवानिवृत्त कर्मचारी सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 पासून तीव्र स्वरुपाचे उग्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.

यशवंत देवधर, प्रभाकर शिंदे, ज्ञानेश्वर चव्हाण, अशोक प्रधान, रावसाहेब काळे, आंद्रेस थोरात, अंकुश प्रधान, आर. एम. अपील, आनंदा गायकवाड, लक्ष्मण जोगदंड, अशोक गायकवाड, नाना शेळके, श्रीपाद बिंदीकर, अनिल काजळे, रंगनाथ झरेकर, भानुदास थोरात, साहेबराव भिवसेन, नामदेव मुरुमकर, रामेश्वर शेळके, भानुदास शेळके, ज्ञानेश्वर वाघ, सुरेश बागडे, बबन पानसरे, भाऊसाहेब रोकडे, दगडू शेळके, किसन जाधव, किशोर झिंगारे, आबा वाघमारे, दिलीप डेरे, छगन वाघ यांच्यासह अन्य सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com