श्रीरामपूर नगरपालिकेने एका दिवसात केली 33 लाखांची वसुली

4 टॉवर व 15 गाळे सील, 25 नळकनेक्शन कट
श्रीरामपूर नगरपालिकेने एका दिवसात केली 33 लाखांची वसुली

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील विविध भागात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकीदार यांच्यावर तीव्र कारवाई करत एका दिवसात 4 टॉवर व 15 गाळे सील करत 25 जणांचे नळकनेक्शन कट करत तब्बल 33 लाख रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे या वर्षात सर्वाधिक वसुली झाली असल्याचा दावा वसुली अधिकार्‍यांनी केला आहे.

काल एका दिवसात शहरातील कर्मवीर चौक व डॉ. रामराव आदिक चौक परिसरात रु. 1,04,000 रुपयांचा रोख वसूल करण्यात आला. वॉर्ड न. 2 मधील उर्दू हायस्कूल मागील परिसरामध्ये थकबाकी पोटी 5 गाळे सील करण्यात आले व 1 लाख 40 हजार रुपये वसूल करण्यात आले. वॉर्ड नं. 1 मध्ये थकबाकीपोटी एकूण 4 टॉवर सील करण्यात आले. यावेळी 8 लाख 64 हजार 874 रुपये वसूल करण्यात आले. वॉर्ड नं. 3 व 4 परिसरात एकूण 3 नळ कनेक्शन थकबाकीपोटी खंडित करण्यात आले व 2 लाख रुपये वसूल करण्यात आले.

वॉर्ड न. 6 मेन रोड व नेवासा रोड परिसरातील व्यावसायिकांकडून 31 लाख 20 हजार 161 रुपये वसूल करण्यात आले तसेच 1 दुकान गाळा व 1 टॉवर सील करण्यात आला. तसेच वॉर्ड न. 7 परिसरात एकून 7 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले व 2 लाख रुपये वसूल करण्यात आले. तसेच मोरगे वस्ती परिसरात 2 लाख 58 हजार 357 रुपये वसूल करण्यात आले. तसेच पालिकेने हद्दीबाहेर दिलेल्या नळ कनेक्शन धारकांकडून देखील पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करण्यात येणार आहे. शहरातील असे एकूण 33 लाख रुपये वसूल करण्यात आले.

तरी शहरातील सर्व नळ कनेक्शनधारक व मालमत्ताधारक यांनी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपालिकेस सहकार्य करावे व होणारी कार्यवाही टाळावी, असे आवाहन प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

नगरपालिकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा www.shirampurmc.org या वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणा करण्यासाठी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. तरी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com