पालिका निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबर

श्रीरामपूर सेना पदाधिकार्‍यांना ना. भुसे व ना. गडाखांचे आश्वासन
पालिका निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत (Shrirampur Municipality Election) आम्ही तुमच्याबरोबरच आहोत, लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन याबाबतचे नियोजन केले जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) व ना. शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी श्रीरामपूरच्या शिवसेना (Shivsena) पदाधिकार्‍यांना दिले.

ना. दादा भुसे हे महात्मा फुले कृषी विद्यापिठात (Mahatma Phule Agricultural University) कार्यक्रमासाठी आले होते. सोनई (sonai) याठिकाणी ना. शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी श्रीरामपूरच्या शिवसेना (Shrirampur Shivsen) पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेवून लवकरच येऊ घातलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली. जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चर्चा झाली. यावेळी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. महेश शिरसागर, श्रीरामपूर शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, डॉ. सोमनाथ गोरे, राधाकिसन बोरकर उपस्थित होते.

यावेेळी डॉ. महेश क्षीरसागर व सचीन बडधे म्हणाले, नगरपालिकेची निवडणुकीबाबत आपण मार्गदर्शन करुन आम्हाला पाठबळ द्यावे. त्यासाठी आमच्याकडे येवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर आम्हाला चांगले नियोजन करता येईल. परिणामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगल्या जागा मिळू शकतील, त्यामुळे आम्हाला पाठबळ द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी ना. भुसे व ना. गडाख यांनी श्रीरामपूरच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. लवकरच कार्यकर्त्याची बैठक घेवून निवडणुकीचे नियोजन करण्याचे आश्वासन (Assurance) त्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी मागितली माहिती

मागील निवडणुकीत शिवसेना पक्षाने नगरपालिका निवडणुकीत लढविलेल्या व मिळालेल्या जागा याबाबतची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांकडे मागविली आहे. यात निवडणूक होऊ घातलेल्या श्रीरामपूरसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com