सत्ताधार्‍यांना भ्रष्टाचारासाठी स्मशानभूमीही पुरेना

श्रीरामपूर नगरपालिका विरोधी गटाचे नगरसेवक दिलीप नागरे यांचा आरोप
सत्ताधार्‍यांना भ्रष्टाचारासाठी स्मशानभूमीही पुरेना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिका (Shrirampur Municipality) सत्ताधार्‍यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कर्मचार्‍यांचे पगारही पुरत नसून, त्यातही पैसे खाण्याचे घाणेरडे काम सत्ताधारी करत असल्याचा आरोप नगरसेवक दिलीप नागरे (Corporators Dilip Nagare) यांनी केला आहे.

स्मशान भूमीतील शवदाहिनी पाहणी करण्यासाठी गेलो असता, स्मशानभूमी तील अंत्यविधी करणार्‍या कर्मचार्‍यांची मुलाखत घेतली, असता अजब प्रकार समोर आला. या कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार त्याला 6000 रुपये मासिक पगार दिला जातो, मात्र 28 हजारांच्या चेकवर त्याची सही घेऊन ती रक्कम पालिकेत जमा करावी लागते.

एकीकडे पालिका सत्ताधारी स्मशानभूमी कर्मचार्‍यास 28 हजार रुपये पगार दाखवते व प्रत्यक्षात मात्र सहा हजार रुपये पगार देते. या कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार हा कर्मचारी चार वर्षापासून स्मशानभूमीत काम करत असून आतापर्यंत त्यास सहाच हजाराने पगार दिलेला आहे बाकीची रक्कम सत्ताधार्‍यांनी हडप केली आहे. म्हणजेच सत्ताधार्‍यांनी भ्रष्टाचारासाठी स्मशानभूमी कर्मचार्‍यांना देखील सोडले नाही. मग या उरलेल्या पैशांचा लाभार्थी कोण? हा प्रश्नही निर्माण झाला आहे. श्रीरामपूरकरांसाठी ही अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल या शब्दांत दिलीप नागरे यांनी पालिका सत्ताधार्‍यांचा निषेध केला आहे. आता आम्ही तक्रार केल्यानंतर नगराध्यक्षा परत हेच म्हणतील मलाही हे आताच कळाले व मी चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्मशानभूमी कर्मचार्‍यास 28,000 रुपये पगारचा चेक देऊन तो बँकेत वटवून, नगरपालिकेत जमा केला जातो परंतु प्रत्यक्षात पगार दिला जातो 6,000 रुपये अशी नगरपालिका कर्मचार्‍याने कबुली दिली असून त्याची व्हीडीओ क्लीप काल दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या हिंदु स्मशानभुमीत गेल्या 4 वर्षापासून वॉचमन व साफसफाईचे काम करतो. हे काम करत असताना मागील 3 ते 4 दिवसांपूर्वी स्मशानभूमिमध्ये चौघे आले त्यांनी मला नाव विचारले व मला म्हणाले की आम्ही सांगतो त्याप्रमाणे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची न दिल्यास तुझ्याकडे बघून घेतो व कामावर कसा राहतो ते बघतो. माझ्या नावाने जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे एडिट केला आहे. समोरच्याने तो पूर्ण व्हिडीओ दाखवल्यास सत्य समोर येईल. मी त्या व्हिडीओमध्ये माझ्यासह तिघाजणांचे पगार (28,800 रुपये) यामधून होतात असे सांगितलेले आहे. तरी याबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. या प्रकाराबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या स्वत:च्या जबाबदारीवर फिर्याद देणार आहे.

- सोनू लक्ष्मण करमंचे, हिंदु स्मशानभुमी, श्रीरामपूर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com