पावसाळ्याच्या दिवसात वैयक्तीक स्वच्छता राखा

पावसाळ्याच्या दिवसात वैयक्तीक स्वच्छता राखा

श्रीरामपूर नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे डास (Mosquitoes) वाढण्याचा संभव असून त्यातून डेंग्यू (Dengue) स्वाईन फ्ल्यू (Swine flu), मलेरिया सदृश रूग्ण (Patients resembling malaria) आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने (Shrirampur Municipal Council) करण्यात आले आहे.

राज्यात तुरळक ठिकाणी डेंग्यु, स्वाईन फ्ल्यू, मलेरिया सदृश्य आजाराचे रुग्ण निदर्शनास येत आहेत. यासाठी शहरात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, रांजण आठवड्यातून एकदा कोरड्या करुन सुकवुनच पाणी भरावे, घराभोवती पाण्याचे डबके साचू देवू नये, फ्लॉवरपॉटमधील पाणी तीन दिवसांनी बदलावे, टायरचे पंक्चर काढणार्‍या व्यावसायिकांनी दररोज पंक्चरचे पाणी बदलावे व निकामी टायर्सची विल्हेवाट लावावी तसेच चांगले टायर्स बंदीस्त खोलीत ठेवावे, अन्यथा सदर टायर्स नगरपरिषदेकडून (Shrirampur Municipal Council) जप्त केले जातील,

काही नागरीक, स्वयंसेवी संस्थांनी मोकाट जनावरांसाठी पाण्याचे हौद केले आहेत. त्यांनीही हौद आठवड्यातून एकदा साफ करुन कोरडे करावेत. घर तसेच परिसरातील साफसफाई व स्वच्छता ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. डेंग्यू, चिकणगुणीयाचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी व हॉटेल मालकांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवाव्यात. घरातील भांडे स्वच्छ घासून घ्यावेत, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी, तसेच इतरत्र धुंकू नये.

आपल्या घराभोवती असलेल्या पाण्याच्या हौदाच्या टाकीत गप्पी मासे सोडावेत. गप्पी मासे दर गुरुवारी 4 ते 6 या वेळेत पुरविण्याची व्यवस्था कामगार हॉस्पिटल उद्यानात करण्यात आली आहे. यासाठी नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख रावसाहेब घायवट, आरोग्य निरीक्षक संजय आरणे, कर्मचारी सुभाष शेळके, रणजित मुखदरे यांच्याशी संपर्क साधावा, परिसरातील पिण्याचे पाण्याचे पाईपलाईनला गळती होत असल्यास व नळास अशुध्द पाणी येत असल्यास नगरपरिषदेस कळवावे. पिण्याचे पाणी उकळून, गाळून थंड करुनच प्यावे, जेणे करुन आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही. शहरातील नागरिकांनी या सुचनांची दखल घेऊन आपले आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक (Mayor Anuradhatai Adik) व मुख्याधिकारी गणेश शिंदे (CEO Ganesh Shinde) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com