आक्षेप असलेल्या ठेकेदारच्या कामास मुदतवाढ कशी? - ससाणे

आक्षेप असलेल्या ठेकेदारच्या कामास मुदतवाढ कशी? - ससाणे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या (Shrirampur Municipal Council) भीमाशंकर एकनाथ परदेशी (Bhimashankar Eknath Pardeshi) या ठेकेदारावर (Contractor) गैरव्यवहाराचे अनेक गंभीर आरोप (Allegations) असून, त्याने अनेक कामांची कामे न करताच बोगस बिले काढलेली आहेत. अशा ठेकेदारावर (Contactor) आक्षेप असतानाही त्याच्या कामास मुदतवाढ कशी देण्यात आली, असा सवाल उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) यांनी केला.

भीमाशंकर परदेशी (Bhimashankar Pardeshi) या ठेकेदारावर (Contractor) उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) व काँग्रेसच्या नगरसेवकांनी (Congress Corporators) गंभीर आरोप (Serious Allegations) केले होते. या ठेकेदाराचे काम आक्षेपार्ह आहे व सर्व थरातून त्याच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे अचानक साक्षात्कार झाल्यासारखे नगराध्यक्षांना तो नकोसा होऊन त्यावर कारवाई होण्यासाठी पत्र काढले होते. आपला गैरव्यवहार (Fraud) उघडा होऊन आपल्यावर कारवाई होणार या भीतीने भीमाशंकर परदेशी व त्याचा मुलगा नितीन परदेशी यांनी एकाच दिवशी दोघेही आजारी असल्याचे पत्र मुख्याधिकार्‍यांना देऊन यापुढे काम करण्यास नकार दिला होता. अशा या ठेकेदारावर सर्व थरातून भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच तो अचानक आजारी पडतो व नगराध्यक्षाही त्यास पत्रक काढून चौकशी (Investigation) करून काळ्या यादीत (Black List) टाकण्याचे आदेश देतात.

ज्यावेळी आम्ही एखादी तक्रार करतो किंवा ती तक्रार घेऊन मुख्याधिकारी (CEO) यांच्याकडे जातो, त्यानंतर त्याची माहिती नगराध्यक्षांना (Mayor) मिळताच त्यांना त्याचा साक्षात्कार होवून त्या लगीच मागील तारखेचे पत्र दाखवून मीही तीच तक्रार (Complaint) केली होती असे सांगतात. असे असतानाही भीमाशंकर परदेशी (Bhimashankar Eknath Pardeshi) या ठेकेदारास सर्वसाधारण सभेतील इतिवृत्तातील ठराव क्रमांक 10 व अ. न. 21 नुसार त्याच्या कामास पालिका सत्ताधारी मुदतवाढ कशी देतात व त्याच मिटींगमध्ये त्याला नविन कामे मंजूर करतात याचा अर्थ या ठेकेदाराच्या बाबतीत नगराध्यक्षांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत असे वाटते व त्यात काहीतरी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करतात असा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) यांनी केला आहे.

पालिका सत्ताधारी अशा ठेकेदारांना पाठीशी घालत असून पालिका सत्ताधारी श्रीरामपूरच्या जनतेची (Shrirampur People) फसवणूक करत असल्याचेही ससाणे (Deputy Mayor Karan Sasane) यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com