श्रीरामपूर : वेळेत कर भरणारांंसाठी पालिकेकडून सवलत योजना

श्रीरामपूर : वेळेत कर भरणारांंसाठी पालिकेकडून सवलत योजना
श्रीरामपूर नगरपरिषद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने श्रीरामपूर शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची रक्कम वेळेत भरणा करणार्‍या सर्व मालमत्ताधारक व नळ कनेक्शन धारकांसाठी विशेष सवलत योजना जाहिर केली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

नगरपालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांंची सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठीची मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची बीले वाटपाचे काम वसुली विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. बील वाटप दिनांकापासून 15 दिवसाच्या आत कराची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरल्यास चालू वर्षातील बिलामधील अग्निशमन कर, वृक्ष कर व संकलित कराच्या रकममेवरती 1 टक्का सुट दिली तसेच असेसमेंट उतारा एक वेळ मोफत दिला जाणार आहे. तसेच ज्या मालमत्तेला रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करण्यात आली आहे अशा मालमत्तेच्या चालू वर्षाच्या बिलातील संकलित कराच्या रकमेत 5 टक्के सुट दिली जाणार आहे.

श्रीरामपूर शहरातील सर्व मालमत्ताधारक व नळ कनेक्शनधारक यांनी सदर सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com