श्रीरामपुरात म्युकरमायकोसिसचे 5 तर राहात्यात 4 रूग्ण

एकावर साखर कामगार रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
श्रीरामपुरात म्युकरमायकोसिसचे 5 तर राहात्यात 4 रूग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात म्युकरमायकोसिस या आजाराने प्रवेश केला असून तालुक्यात 5 तर राहाता तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णावर येथील साखर कामगार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वीही झाली असल्याची माहिती तालुका आरोेग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसर्‍या लाटेने हाहाकार करुन सोडला होता. त्यात आता म्युकरमायकोसिस हा आजार नव्याने आला असून श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील 9 जणांना या आजारावर जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार सुुरु आहेत.

या रुग्णांवर यात एका रुग्णाचा करोना अहवाल निगेटीव्ह आला असून त्यास येथील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार सुुरू होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉ. प्रणवकुमार ठाकूर, डॉ. गणेश जोशी, डॉ.शरद सातपुते, डॉ. ऋतुजा जगधने यांनी ही शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वी झाली आहे. सद्यस्थितीत या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाचे डॉ.रवींद्र जगधने यांनी दिली.

म्युकरमायकोसिस हा करोनापेक्षाही जास्त घातक ठरत आहे. यामागील कारण आहे की, करोना आपल्याला सांभाळून घेण्यासाठी वेळ देतो. जर चांगल्या प्रकारे उपचार झाले तर 7 ते 21 दिवसांमध्ये रुग्ण यातून बाहेर पडू शकतो. बर्‍याचदा तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होण्याची गरज पडत नाही. काही औषधे आणि पथ्यांचे पालन केले तर केले तर रुग्ण घरीदेखील बरा होऊ शकतो. ज्याला होम क्वारंटाईन म्हणतात. पण म्युकरमायकोसिस एवढा घातकअसून आपल्याला सांभाळून घेण्याची संधीही देत नाही. याचं मुख्य कारण आहे की म्युकरमायकोसिस परिणाम सर्वात आधी नाक आणि जबड्याच्या आजूबाजूला असणारे सायनसेस यावर होतो आणि तिथून डोळ्यांकडे पसरतो. गंभीर परिस्थितीमध्ये मेंदूचा देखील समावेश होतो डोळे, जबडा, नाक हे मेंदूपासून खूप जवळ आहेत.

याच्या उपचारासाठी सर्जरीसोबत औषधेदेखील खूप गरजेचे आहेत. औषधंची उपलब्धता कमी आणि खूप महाग असल्यामुळे रुग्णाला खूप खर्च येतो. जसे कि म्युकरमायकोसिस हा गावा गावांमध्ये पसरत आहे आणि आतापर्यंत रुग्णाला उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागायचे. त्यामुळे शहरामध्ये हॉस्पिटलचा तसेच राहण्याच्या खर्चाचा भारही रुग्णावर येतो, असेही डॉ. प्रणय कुमार ठाकुर यांनी सांगितले.

काळ्या बुरशीची लक्षणे

काळ्या बुरशीमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.

बचाव कसा करायचा ?

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा

तसेच करोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.

श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यातील म्युकरमायकोसिस आजाराने 9 रुग्ण त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यात श्रीरामपूर शहरातील 4, भोकर-1, राहाता तालुक्यातील चितळी-2, शिर्डी-1, तर जळगाव-1 यांचा समावेश आहे.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा काय प्रकार आहे?

म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे करोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर वेळीच उपचार करणे फार महत्वाचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com