आठ लाखाच्या 12 दुचाकी पोलिसांकडून जप्त

आठ लाखाच्या 12 दुचाकी पोलिसांकडून जप्त

राहाता तालुक्यातील रांजणगावच्या सराईत मोटारसायकल चोरास अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुका पोलिसांनी सापळा रचून सराईत मोटारसायकल चोरास अटक (Motorcycle thief arrested) केली. त्याच्याकडून 8 लाख 30 हजार रुपये किमतीची 12 दुचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दत्तू सावळेराव पवार (वय 29, रा. रांजणगाव, ता. राहाता) असे अटक केलेल्या मोटारसायकल चोराचे (Motorcycle thief arrested) नाव आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (Deputy Superintendent of Police Sandeep Mitke) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे (Police Inspector Madhukar Salve) यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात आली असून या अंतर्गत तसेच पोलीस निरीक्षक साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रांजणगाव (Rajangav) येथे सापळा रचून दत्तू सावळेराव पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून बजाज कंपनीच्या 3, हिरो होंडा कंपनीच्या 8, टिव्हीएस स्टार कंपनीची 1, अशा एकूण 8 लाख 30 हजार रुपये किमतीची 12 दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. दत्तू पवार याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक आढागळे करीत आहेत.

यापूर्वी दत्तू पवार याच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात (Rahata Police Station) 6 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 12 गाड्यांसह एकूण 18 गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (Upper Superintendent of Police Saurabh Agarwal), अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे (Upper Superintendent of Police Dr. Deepali Kale), पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके (Police Sub-Divisional Officer Sandeep Mitke) यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, सहायक फौजदार ए. बी. आढागळे, एस. आर. गोरे, पोलीस कॉन्स्टेबल आयुबब शेख, अली हबीब, पोलीस नाईक अनिल शेंगाळे, आबासाहेब गोरे, दादासाहेब लोढे, दादासाहेब गुंड, साजीद पठाण, चांदभाई पठाण, प्रशांत रणनवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com