श्रीरामपुरात दोन मोटारसायकलची चोरी

 दुचाकी चोरी
दुचाकी चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील वॉर्ड नं. 7, सिध्दीविनायक गणपती मंदिर रोड, मोरगे वस्ती व वॉर्ड नं. 3, दत्तमंदिर, चुडीवाल क्लासेस येथून बजाज पल्सर 150 सीसी कंपनीच्या दोन मोटारसायकल दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार दि. 20 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 ते 11.30 च्या दरम्यान शहरातील वॉर्ड नं. 7, सिध्दीविनायक गणपती मंदिर रोड, मोरगे वस्ती येथून 35 हजार रुपये किंमतीची एमएच 17 एएक्स 9701 या क्रमांकाची काळ्या रंगाची बजाज पल्सर 150 सीसी या कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेली. तसेच वॉर्ड नं. 3, दत्तमंदिर, चुडीवाल क्लासेस या ठिकाणाहून 35 हजार रुपये किंमतीची एमएच 17 बीजे 8373 या क्रमांकाची बजाज पल्सर 150 सीसी कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.

याप्रकरणी श्रीरामपर शहर पोलीस ठाण्यात बळीराम विठ्ठल होवाळ व महेंद्र मदनलाल गदिया या दोघांनी दोन वेगवेगळ्या फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजि. नं. 1078/2022 व 1079/2022 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com