श्रीरामपूर शहरात मोटारसायकल चोरट्यांचा सुळसुळाट

तीन मोटारसायकलचे लॉक तोडून पळविण्याचा प्रयत्न
श्रीरामपूर शहरात मोटारसायकल चोरट्यांचा सुळसुळाट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात मोटारसायकलचे लॉक तोडून मोटारसायकल पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मोटारसायकल चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कंपाउंडमध्ये असलेल्या दोन मोटारसायकलचे लॉक तोडून पळविण्याचा प्रयत्न झाला. तरी पोलिसांनी या मोटारसायकल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरात मोटारसायकल चोरणे व मोटारसायकलमधील पेट्रोल चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोेरीच्या अनेक तक्रारी व फिर्यादी दाखल आहेत मात्र त्याचा तपास अद्याप लागलेला नसल्याने अनेकजण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचेही टाळत आहेत. दसर्‍यानिमित्त काल रावण दहन व दसर्‍याच्या सिमोल्लंघन यामुळे गर्दी वाढली होती.

या गर्दीचा फायदा घेत मोटारसायकल चोरट्यांनी संधीचा फायदा घेतला. काल कंपाउंडमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकलीचे लॉक तोडले मात्र कोणीतरी येण्याची चाहूल लागताच चोरटे पळून गेले. कर्मचारी काम संपवून घरी जाण्यासाठी खाली आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तातडीने दखल घेत घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com