श्रीरामपुरात दोन मोबाईल चोर पकडले

श्रीरामपुरात दोन मोबाईल चोर पकडले

आरोपींवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल; मोबाईलसह मोटारसायकल हस्तगत

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलिसांनी अनेक गुन्ह्यात हवे असलेल्या दोन मोबाईल चोरांना एसटी स्टँड पसिरात सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून मोबाईलसह या गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची मोटारसायकल हस्तगत केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या दोन आरोपींविरुध्द विविध गुन्हे दाखल आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सुहास बाबुराव फुलपगार यांच्या शर्टचे खिशातून 21 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन एका विनानंबर प्लॅटिना गाडीवरून येऊन दोन इसमांनी बळजबरीने हिसकावून नेला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. 1103/2020 भा.दं.वि. कलम 392/ 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना श्रीरामपूर शहरातील सराईत गुन्हेगार शाहरुख अफसर शेख (रा. वॉर्ड नंबर 6 श्रीरामपूर ) व त्याचा साथीदार बाबर जानमहमंद शेख (रा.वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर) यांच्याकडे चोरीची मोटारसायकल आहे व ते बसस्टॅन्ड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने डीबी पथकाचे पो. हे. कॉ. जे. के. लोंढे, पो. कॉ. अर्जून पोकळे, पंकज गोसावी, सुनिल दिघे, किशोर जाधव, गणेश गावडे, पो. कॉ. महेंद्र पवार यांच्या पथकाने बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे मोबाईलबाबत व मिळून आलेल्या प्लॅटिना मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता ते चोरीचे असल्याबाबत कबुली दिली. त्यांच्याकडुन गुन्ह्यातील 21 हजारचा रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन, या गुन्ह्यात वापरलेली 25 हजार रुपये किंमतीची एक विना नंबरची प्लॅटिना मोटारसायकल असा 46 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह,अप्पर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, श्रीरामपूर विभाग यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.श्रीहरि बहिरट यांच्यासह सपोनि समाधान पाटील, तपास पथकाने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com