श्रीरामपूर एमआयडीसीबाबत बैठक घेणार

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
श्रीरामपूर एमआयडीसीबाबत बैठक घेणार

नागपूर |प्रतिनिधी| Nagpur

अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) श्रीरामपूर एमआयडीसीला (Shrirampur MIDC) सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

श्रीरामपूर एमआयडीसीबाबत बैठक घेणार
जिल्ह्यासाठी 7 कोटी 37 लाखांचा संभाव्य टंचाई कृती आरखडा पाणी टंचाई

श्रीरामपूर (Shrirampur) येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Maharashtra Industrial Development Corporation) वसाहतीच्या सोयी सुविधांबाबत काँग्रेसचे आमदार लहू कानडे (Congress MLA Lahu Kanade) यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत यांनी एमआयडीसी (MIDC) परिसरात देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. तथापि आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर एमआयडीसीबाबत बैठक घेणार
प्रत्येक आमदाराला मिळणार 80 लाखांचा निधी

तर लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनी अनेक रासायनिक उद्योग आपले सांडपाणी आणि घातक रसायने एमआयडीसी हद्दीत टाकून कचरा करतात, अशी तक्रार केली. श्रीरामपूर एमआयडीसीला (Shrirampur MIDC) मिळालेल्या सुविधांबाबत अनेक त्रुटी आहेत, असेही कानडे यांनी सांगितले.

श्रीरामपूर एमआयडीसीबाबत बैठक घेणार
बेकायदा उत्खननातून विळद घाटातील डोंगरच गायब

दरम्यान, या प्रश्नावरील चर्चेतभाग घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि उदय सामंत यांच्यात शाब्दिक टोलेबाजी रंगली. भुजबळ यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला नेत्रदीपक यश मिळाल्याचे सांगत निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग परत आणता येतील का? असा मिश्किल सवाल केला. त्यावर गेल्या सरकारने उद्योगांना प्रोत्साहनपर अनुदान दिले नाही. गेले १८ महिने उच्चाधिकार समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे प्रकल्प गुजरातला गेले, असा टोला सावंत यांनी लगावला.

श्रीरामपूर एमआयडीसीबाबत बैठक घेणार
दीपाली सय्यद यांच्या ट्रस्टमधील व्यवहार बेकायदेशीर

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com