श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीतील लाखो रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी

श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीतील लाखो रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी

रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol

एमआयडीसी परिसरातील कृष्णा सिमेंट पाईप प्रोडक्शन कंपनीतील लाखो रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेट चोरी गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीतील लाखो रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी
धक्कादायक ! करंजीत भगरीच्या पिठाची भाकर खाल्ल्याने पंधरा जणांना विषबाधा

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील एमआयडीसी परिसरात असणारे कृष्णा सिमेंट पाईप प्रोडक्शन या कंपनीतील अंदाजे दोन टन लाखो रुपये किमतीच्या लोखंडी प्लेट चोरी गेले आहेत. निकेत बोराडे यांच्या मालकीची कृष्णा सिमेंट प्रोडक्शन ही कंपनी एमआयडीसी परिसरातील ए 148 सेक्टरमध्ये आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी प्लेट चोरून नेल्याच्या घटना घडली आहे.

श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीतील लाखो रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी
साईसंस्थानकडून पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण

या प्लेट चोरीच्या दरम्यान जेसीबी वापर करण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे. 80 ते 90 किलो वजनाची असलेली ही लोखंडी प्लेट उचलणे शक्य नसल्याने मशीनचा वापर करण्यात आला आहे. या धाडसी चोरी बाबतची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक एस बी देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकनगर पोलीस चौकीचे साईनाथ राशिनकर, मच्छिंद्र शेलार, रघुवीर कारखिले, बाळासाहेब गुंजाळ आदी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेच्या पंचनामा केला आहे.

श्रीरामपूर एमआयडीसी कंपनीतील लाखो रुपयांच्या लोखंडी प्लेटा चोरी
20 पटाच्या शाळा बंद करण्यासंदर्भात हालचालीची शक्यता

अनिकेत बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात मोठ्या किंवा किरकोळ अशा चोरीच्या घटना सतत घडत आहे. पोलिसांनी ठसे तज्ञ बोलावून चोरीचा तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. घटनेनंतर निकेत बोराडे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. चोरट्यांना त्वरित जेरबंद करावे करावे अशी फिर्याद देऊन त्यांनी मागणी केली आहे. तसेच रांजणखोल, टिळकनगर, दत्तनगर परिसरात पोलिसांनी आपले गस्त कायम ठेवावे अशी ही मागणी करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com