नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मध्यस्तीनंतर चव्हाण-शहा यांच्यातील वादावर अखेर पडदा

नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या मध्यस्तीनंतर
चव्हाण-शहा यांच्यातील वादावर अखेर पडदा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण व रमजान शहा यांच्यात जन्म दाखल्यातील नावात झालेल्या चुकीवरून वाद झाला होता. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर चव्हाण व शहा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला.

पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण व रमजान शहा यांच्यात जन्म दाखल्यातील नावात झालेल्या चुकीवरून झालेल्या वादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. मात्र नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी चव्हाण व शहा यांचे म्हणणे ऐकून मध्यस्थी करत अखेर या प्रकारावर पडदा पडला. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, रईस जहागीरदार, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष अल्तमश पटेल, साजिद मिर्झा, तौफिक शेख, रोहित शिंदे, अनिल इंगळे, फयाज कुरेशी आदी उपस्थित होते.

प्रशासकीय पातळीवर काम करताना अधिकारी कर्मचारी व नागरिकांमध्ये सुसंवाद असला पाहिजे, काल झालेला प्रकार हा गैरसमजुतीतून झाला, दोघांनाही हा प्रकार लक्षात आल्याने एकमेकांना समजून घेत त्यांनी घटनेबाबत दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडला.

नगराध्यक्षा आदिक यांनी पालिकेच्या माध्यमातून कामगारांंच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे, त्या नेहमी प्रशासनाच्या बाजूने उभ्या राहिल्या आहेत. यापुर्वी 2017 मध्ये गणेशोत्सवात पालिकेच्या कर्मचार्‍यांना पोलिसांमार्फत ड्युटीवर असताना मारहाण झाली होती. त्यावेळी नगराध्यक्षा आदिक यांनी प्रांत कचेरीवर मोर्चा काढला होता. त्यांच्या शब्दाखातर आणि शहा यांनी चूक मान्य करून चव्हाण यांची दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा पडल्याचे कामगार नेते दीपक चव्हाण यावेळी म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com