ट्रॅक्टरच्या धडकेत विवाहित तरुण ठार ; संतप्त जमावाकडून रास्ता रोको

ट्रॅक्टरच्या धडकेत विवाहित तरुण ठार ; संतप्त जमावाकडून रास्ता रोको

टिळकनगर | वार्ताहर

तालुक्यातील दत्तनगर येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडून दत्तनगर आंबेडकर वसाहत येथील विवाहित तरुणाचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. अनिल बन्सी कोळगे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे असून स्थानिक नागरिकांनी याच रस्त्यावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत घटनास्थळी रास्ता रोको करण्यात आला.

याबाबद अधिक माहिती अशी की, मृत अनिल कोळगे आपल्या जोडीदारासह सकाळी रस्त्याच्या कडेला उभा होता. श्रीरामपूरहून बाभळेश्वरच्या दिशेने सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असतांना रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या अनिल कोळगेला ट्रॅक्टर ट्रॉलीचा जोरदार फटका बसला व काही क्षणातच जमिनीवर कोसळला.

स्थानिक नागरिकांनी लगेचच अनिलला श्रीरामपूर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केले. ट्रॅक्टर चालक घटना घडताच ट्रॅक्टर सोडून पळून गेला. घडलेल्या घटनेने स्थानिक ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली व याठिकाणी तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको करून आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे निषेध करण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचवून आंदोलनकर्त्यांना शांत करत वाहतूक सुरळीत केली. मृत अनिल मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त असून त्याच्या पश्त्यात आई, भाऊ, तीन मुली असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com