श्रीरामपूर बाजार समितीचे सचिव काळेंचा पदभार तडकाफडकी काढला

श्रीरामपूर बाजार समिती
श्रीरामपूर बाजार समिती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील सहायक निबंधक दिपक नागरगोजे यांनी श्रीरामपूर बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांचा पदभार तडकाफडकी काढून घेत साहेबराव वाबळे यांच्याकडे सोपविल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सहायक निबंधक नागरगोजे यांनी सुट्टीचा दिवस असताना काल 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाजार समितीचे सचिव काळे यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना पदाची सुत्रे व कार्यालयाच्या चाव्या बाजार समितीतील कांदा मार्केट विभाग प्रमुख साहेबराव वाबळे यांच्याकडे देण्यास सांगितले. काळे यांनी प्रारंभी त्यास नकार दिला. फोनाफोनी झाल्यानंतर मात्र काही वेळाने त्यांनी वाबळे यांच्याकडे पदभार सोपविला. रात्री उशिरापर्यंत ही कार्यवाही सुरु होती.

याबाबत सहायक निबंधक नागरगोजे, सचिव किशोर काळे तसेच साहेबराव वाबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

काल शनिवारी कार्यालयीन सुटी असताना सुटीच्या दिवशी तसेच घाईघाईने हा निर्णय का घेण्यात आला, याचे कारण मात्र समजू शकले नाही. काळे यांच्याविषयी सहायक निबंधक तसेच ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला असून चौकशी पूर्ण होईपर्यंत वाबळे यांच्याकडे पदभार राहणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com