
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जांगासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज छाननीत 9 जणांचे अर्ज बाद झाले आहे. त्यामुळे आता 230 जणांचे उमेदवारी शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणात किती उमेदवार उभे ठाकतात याबाबत 20 मार्च रोजी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज बाद झालेल्यांमध्ये व्यापारी मतदार संघात 4, ग्रामपंचायत मतदार संघात 2, सोसायटी मतदार संघात 3 असे 9 जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यात व्यापारीमध्ये अमित रतीलाल कोठारी, रमेश रामचंद्र भंडारी, नितीन धनराज ललवाणी, जयंत भाऊसाहेब थेटे, ग्रामपंचायतमध्ये रामभाऊ निवृत्ती वमने, गणेश सीताराम कांबळे, सोसायटीत शिवाजी अप्पासाहेब शेजुळ, चंद्रभान बाबासाहेब वाघ, विठ्ठल नानासाहेब बनकर यांचा बाद झालेल्यांत समावेश आहे.
बाजार समिती निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघात 141, ग्रामपंचायत मतदार संघात 61, व्यापारी आडते 20 हमाल मापाडी 8 असे एकूण 230 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल शिल्लक आहेत.उद्या गुरुवार दि. 6 ते 20 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची अंतिम _मुदत_ आहे. 21 एप्रिलला चिन्ह वाटप तर 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते साय. 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणी होणार आहे. दि. 20 एपिलनंतर कोण कोण उमेदवारी करणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.