श्रीरामपूर बाजार समितीत कांदा 1500, गहू 2050 तर सोयाबीनला 6200 रुपये भाव

श्रीरामपूर बाजार समितीत कांदा 1500, गहू 2050 तर सोयाबीनला 6200 रुपये भाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील कृषि उत्पन्न बाजार समिती भाजीपाला, कांदा व भुसार मार्केटमध्ये शेतमालाचे बाजारभाव निघालेले असून कांदा 1500 रुपयापर्यंत जावून पोहोचला आहे. तर गव्हाचा 2050 इतका भाव निघाला आहे. सोयाबीन 6200 रुपयापर्यंत गेली आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा मार्केट मध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे. कांदा मार्केटमध्ये एकूण 4002 क्विटल कांद्यााची आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कांदा कमीत कमी 850 ते जास्तीत जास्त 1500 रू. क्विटल, नंबर 2 कांदा कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 800 व नंबर 3 कांदा कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 450 क्विटल तसेच गोल्टी कांदा कमीत कमी रू.500 ते जास्तीत जास्त रू.950 बाजारभाव निघालेले आहेत. बाजारभाव स्थिर आहेत.

भुसार मार्केटमध्ये 65 क्विंटल आवक झाली असून गहू या शेतमालाचे 6 क्विंटल आवक झाली असून कमीतकमी 1900 रू. जास्तीत जास्त रू.2050 व सरासरी रु.2000 भाव निघालेले आहेत. सोयाबीन या शेतमालाचे 21 क्विटल आवक झाली असून कमीत कमी 5400 रू. जास्तीत जास्त रू.6200 व सरासरी रु. 6000 भाव निघालेले आहेत. लिंबु या शेतमालाचे 8 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी रू.20 किलो, जास्तीत जास्त 30 सरासरी 25 रू. किलो या दराने निघालेले आहेत. उन्हाळयामुळे लिंबाला जास्त मागणी असल्याने बाजारभाव वाढलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com