श्रीरामपुरात कांदा 1050, गहू 2450 तर सोयाबीन 7 हजार रुपये भाव

श्रीरामपुरात कांदा 1050, गहू 2450 तर सोयाबीन 7 हजार रुपये भाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांदा 1050 रुपये भाव निघाला असून भुसारमध्ये गहू 2450 तर सरासरी भाव 2175 रुपये इतका निघाला असून सोयाबीन 7 हजार रुपयांपर्यत जावून पोहोचली आहे.

काल बुधवार दि. 4 मे 2022 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूर येथील कांदा व भुसार मार्केटमध्ये खालीलप्रमाणे शेतमालाचे बाजारभाव निघालेले आहे.

कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली आहे. मार्केटमध्ये एकूण 2389.03 क्विटल आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कांदा कमीत कमी 700 ते जास्तीत जास्त 1050 रूपये क्विटल नंबर 2 कांदा कमीत कमी 450 ते जास्तीत जास्त 650 च नंबर 3 कांदा कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 400 क्विटल तसेच गोल्टी कांदा कमीत कमी रू.500 ते जास्तीत जास्त रु.700 बाजारभाव निघालेले आहेत.

भुसार मार्केटमध्ये 59 क्विटल आवक झाली असून गहू या शेतमालाचे बाजारभाव कमीत कमी रू. 1750 व जास्तीत जास्त रू.2450 व सरासरी रू.2175 निघाले आहे. हरवरा या शेतमालाचे कमीत कमी 3800 रू जास्तीत जास्त रू.4400 व सरासरी रु.4000 भाव निघालेले आहेत. सोयाबीन या शेतमालाचे कमीत कमी 6000 रू जास्तीत जास्त रु.7000 व सरासरी रु.6500 भाव निघालेले आहेत.

Related Stories

No stories found.