श्रीरामपुरात कांदा 2500 तर सोयाबीन 5750 रुपये

श्रीरामपुरात कांदा 2500 तर सोयाबीन 5750 रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व भुसार मार्केटमध्ये सोमवारी कांद्याला 2500 रुपये तर सोयाबीनला 5750 रुपये क्विंटल असा भाव मिळाला आहे.कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची 13477 गोणीतून एकूण 7322-05 क्विंटल आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1700 ते जास्तीत जास्त 2500 रुपये क्विटल, नंबर 2 कांदा 150 ते 1650 व नंबर 3 कांदा 300 ते 900 तसेच गोल्टी कांदा 900 ते 1350 तसेच एक्ट्रॉ सुपर काद्याची 153 गोणी आवक होऊन 2700 व 70 गोणीसाठी 2600 रुपये क्विटल असे बाजारभाव निघाले.

भुसार मार्केटमध्ये एकूण 82 क्विंटल मालाची आवक झाली. त्यात गव्हाची 9 क्विंटल आवक होऊन.2300 ते 2500 व सरासरी 2400, हरभर्‍याची 10 किंवटल आवक होऊन 3500 ते 4200 व सरासरी 3900, सोयाबीनची 55 क्विंटल आवक होऊन 5000 ते 5750 व सरासरी 5450 तर मक्याची 8 क्विंटल आवक होऊन 1200 ते 1625 व सरासरी 1450 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com