श्रीरामपुरात कांदा 2321 तर सोयाबीन 5600 रुपये क्विंटल

श्रीरामपुरात कांदा 2321 तर सोयाबीन 5600 रुपये क्विंटल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये कांद्याला 2321 रुपये तर सोयाबीनला 5600 रुपये क्विंटल असा भाव निघाला आहे. येथे कांद्यासह सोयाबीनच्या भावात वाढ होताना दिसत आहे.

काल मंगळवारी कांदा मार्केटमध्ये 53 साधनातून एकूण 660-55 क्विंटल कांद्याची आवक होऊन नंबर 1 कांदा कमीत कमी 1600 ते जास्तीत जास्त 2321 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 950 ते 1550 व नंबर 3 कांदा 300 ते 900 तसेच गोल्टी कांदा 850 ते 1350 रुपये क्विंटलने विकला गेला.

भुसार मार्केटमध्ये एकूण 20 क्विंटल मालाची आवक झाली असून सोयाबीनची 19 क्विटल आवक होऊन 5000 ते 5600 व सरासरी 5400 रुपये क्विंटल तर तूरीची 1 क्विंटल आवक होऊन 6000 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com