श्रीरामपुरात कांदा 1500 तर सोयाबीनला 5650 रुपये भाव

श्रीरामपुरात कांदा 1500 तर सोयाबीनला 5650 रुपये भाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील कांदा व भुसार मार्केटमध्ये आज कांद्याला 950 ते 1500 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 5650 रुपये क्विंटल भाव निघाले आहेत. कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची लुज मार्केटमध्ये 107 साधनांतून 1781-43 क्विंटल आवक झाली.

यावेळी नंबर 1 कांदा कमीत कमी 950 ते जास्तीत जास्त 1500 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 650 ते 900 व नंबर 3 कांदा 300 ते 600 रुपये क्विंटल तर गोल्टी कांद्याला 750 ते 1100 रुपये असे भाव निघाले.

भुसार मार्केटमध्ये 14 क्विंटल आवक झाली असून गव्हाची 3 क्विंटल आवक होऊन 2000 रुपये क्विंटल भाव निघाले. सोयाबीनची 11 क्विंटल आवक झाली असून 5400 ते 5650 व सरासरी 5500 रुपये क्विंटल भाव निघाले असल्याची माहिती सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com