
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या येथील कांदा, भुसार मार्केटमध्ये काल दि. 23 जून रोजी कांद्याला 950 ते 1463 रुपये तर सोयाबीनला 5850 ते 5950 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत. अनेक शेतकर्यांनी गेल्या वर्षीच्या सोयाबीनची साठवणूक केलेली असून सोयाबीनच्या दरात घट होत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची गोण्यांबरोबरच मोकळा कांदा येत आहे. मार्केटमध्ये लुज कांद्याची 83 साधने आली असून एकूण 13045 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांद्याला कमीत कमी 950 ते जास्तीत जास्त 1463 रुपये क्विंटल, नंबर 2 कांद्याला 650 ते 900 व नंबर 3 कांद्याला 350 ते 600 क्विंटल तर गोल्टी कांद्याला 850 ते 1050 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत.
मार्केटमध्ये 29 क्विंटल भुसार मालाची आवक झाली. त्यात हरबर्याची 5 क्विंटल आवक होऊन 3500 ते 3800 रुपये व सरासरी 3700 रुपये क्विंटल भाव निघाले. सोयाबीनची 20 क्विंटल आवक झाली असून 5850 ते 5950 रुपये क्विंटल व सरासरी 5900 रुपये क्विंटल भाव निघाले. तुरीची 3 क्विंटल आवक होऊन 4800 रुपये क्विंटल बाजारभाव निघालेे तर 1 क्विंटल उडीदाची आवक होऊन 3709 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले. शेतकर्यांनी आपला कांदा प्रतवारी करून मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी केले आहे.