श्रीरामपुरात कांदा 1100 रुपये तर सोयाबीन 7400 रुपये

श्रीरामपुरात कांदा 1100 रुपये तर सोयाबीन 7400 रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याला 1100 रुपये तर सोयाबीनला 7400 रुपये भाव मिळाला आहे. सोयाबीनचे भाव 200 रुपयांनी वाढले आहेत तर कांद्याचे भाव स्थिर आहेत. काल बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली असून मार्केटमध्ये कांदा 4568 गोण्याची आवक झाली आहे. एक नंबर कांदा 800 ते 1100, दोन नंबर कांदा-500 ते 750, तीन नंबर कांदा-200 ते 450 रुपये भाव मिळाला आहे. गोल्टी कांद्याला 400 ते 750 असे बाजारभाव निघाले आहेत.

सोयाबीनचा बाजारभाव कमीतकमी 7200 तर जास्तीत जास्त 7400 रुपये भाव निघाले असून सरासरी भाव 7300 रुपये भाव निघाला आहे. सोयाबीने भाव 200 रुपयांनी वाढलेले आहेत. भुसारमालामध्ये गहू 77 क्विंटलची आवक झाली आहे. गहु कमीत कमी 2000 तर जास्तीत जास्त 2400 रुपये भाव निघाले आहेत. सरासरी भाव 2175 रुपये निघाला आहे. गव्हात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. हरभरा कमीत कमी 4000 रुपये तर जास्तीत जास्त 4400 रुपये भाव निघाला असून सरासरी 4275 रुपये इतका निघाला आहे.

Related Stories

No stories found.