श्रीरामपुरात कांदा 3550 तर सोयाबीन 5000 रुपये क्विंटल

श्रीरामपुरात कांदा 3550 तर सोयाबीन 5000 रुपये क्विंटल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील कांदा मार्केटमध्ये उन्हाळी काद्याला 3550 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 5000 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत. कांदा मार्केटमध्ये 10,990 कांदा गोणीतून एकूण 6010-81 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 2350 ते जास्तीत जास्त 3550 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 1350 ते 2300 व नंबर 3 कांदा 300 ते 1300 तसेच गोल्टी कांदा 1200 ते 1900 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले.

एक्ट्रॉ सुपर कांद्याची 20 गोणी आवक झाली असून त्यास 3550 ते 3700 प्रति क्विंटल असे बाजारभाव निघाले. तसेच 11 गोणीस 4000 रुपये भाव निघाले. भुसार मार्केटमध्ये एकूण 153 क्विंटल मालाची आवक झाली असून त्यात सोयाबीनची 141 क्विंटल आवक होऊन 4500 ते 5000 तर सरासरी 4850 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले आहेत.

तसेच बाजरीची 1 क्विंटल आवक होऊन 1500 रुपये, मक्याची 8 क्विंटल आवक होऊन 1500 रुपये, हरभर्‍याची 2 क्विंटल आवक होऊन 3500 ते 3800 रुपये तर मुगाची 1 क्विंटल आवक होऊन त्यास 6200 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com