
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर बाजार समितीमध्ये लूज (मोकळा) कांदा मार्केट ला 1051 तर भुसार मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 भाव, तर उपबाजार बेलापूरला गव्हाला 1900 ते 2200 भाव व टाकळीभानला 2000 ते 2250 असे भाव निघाले आहेत.
श्रीरामपूर बाजार समितीमध्ये लूज (मोकळा) कांदा मार्केटला भाव हे 100 ते 1051 तर गोल्टी कांदा 300 ते 500 भाव मिळाला, तर भुसार मार्केट येथे सोयाबीनची आवक झालेली असून भाव हा 4900 ते 5000 रुपये मिळाला व गहु 1900-2500 हरभरा- 3600-4600 यांची आवक झाली असून यांचे दर पण चांगले आहे, अशी माहिती बाजार समितीचे प्र. सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे.