श्रीरामपुरात कांदा 1531 रुपये

श्रीरामपुरात कांदा 1531 रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील मुख्य बाजारात कांद्याला 1531 रुपये क्विंटल तर सोयाबिनला 4700 रुपये क्विंटल असा भाव निघाला आहे.

येथील कांदा मार्केटमध्ये 65 वाहनांतून 1083.25 क्विंटल कांद्याची आवक झाली. लिलावात 1 नं. कांद्याला कमीत कमी 950 ते जास्तीत जास्त 1531 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. 2 नं. कांद्याला 650 ते 900, 3 नं. कांदा 300 ते 600 तर गोल्टी कांद्याला 750 ते 1050 रुपये क्विंटल असा भाव निघाला.

भुसार बाजारात 17 क्विंटल मालाची आवक झाली. सोयाबिनची 16 क्विंटल आवक होऊन त्यास 4700 रुपये तर मुगाची 1 क्विंटल आवक होऊन त्याला 6100 रुपये असा भाव निघाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com