श्रीरामपुरात कांद्याला 1270 रुपये भाव

श्रीरामपुरात कांद्याला 1270 रुपये भाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या येथील कांदा व भुसार मार्केटमध्ये काद्याला 900 ते 1270 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 6 हजार रुपये क्विंटल असे भाव निघाले आहेत. कांदा मार्केटमध्ये उन्हाळी लुज कांदयाची 129 साधनांची आवक झाली असून एकूण 2121 क्विंटल कांद्याची आवक झाली.

त्यातील नंबर 1 कांद्याला कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1270 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 600 ते 850 व नंबर 3 कांदा 300 ते 550 क्विंटल तसेच गोल्टी कांदा 750 ते 950 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले. भुसार मार्केटमध्ये 3 क्विंटल मालाची आवक झाली असून गव्हाची 2 क्विंटल आवक होऊन 2000 रुपये क्विंटल तर सोयाबीनची 1 क्विंटल आवक होऊन 6000 रुपये क्विंटल भाव निघाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com