श्रीरामपुरात कांदा 1360 रुपये तर सोयाबीन 5100 रुपये

श्रीरामपुरात कांदा 1360 रुपये तर सोयाबीन 5100 रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या येथील मार्केटमध्ये कांदा 1360 रुपये क्विंटल तर सोयाबीनला 5100 रुपये क्विंटल असा भाव निघाला आहे.

बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एकूण 1600.55 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील 1 नंबर कांदा कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1360 रुपये क्विटल, नंबर 2 कांदा 650 ते 850 व नंबर 3 कांदा 250 ते 600 तसेच गोल्टी कांदा 700 ते 900 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघालेले आहेत.

भुसार मार्केटमध्ये 12 क्विंटल मालाची आवक झाली. सोयाबीन या मालाची 11 क्विंटल आवक झाली असून 5100 रुपये इतका भाव मिळाला आहे. मुग या शेतमालाची 1 क्विंटल आवक झाली असून त्यास 6800 रुपये इतका भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com