..‘त्या’ व्यापार्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यास मान्यता

श्रीरामपूर बाजार समिती निवडणूक
..‘त्या’ व्यापार्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यास मान्यता

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदार संघाच्या मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याने अनेक व्यापार्‍यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे हरकती घेतल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी परवानगी मिळाल्याने पेच संपला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून डिसेंबर महिन्यात मतदान होत आहे. प्रारुप मतदार जाहीर झाल्यानंतर व्यापारी मतदारसंघात अनेक व्यापार्‍यांची नावे वगळण्यात आली होती. या यादीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, श्रीनिवास बिहाणी, मर्चंटचे माजी अध्यक्ष विशाल किशोर फोपळे, राकेश अनिल न्याती, माजीद रशीर शेख, गणेश युवराज खैरे, राजेद्र शिवाजी भोसले, रुपेश मदनलाल धाडीवाल, प्रेमचंद हिरालाल कुंकूलोळ, लोकेश रमेश लोढा, कल्याण बुधमल कुंकूलोळ, महेंद्र मदनलाल गदीया, अभिषेक शरद नवले, अमोल विठ्ठल गाडे आदींनी आक्षेप घेत हरकती दाखल केल्या होत्या.

त्यावर 27 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांच्यासमोर बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे, सचिव किशोर काळे यांचे उपस्थितीत सुनावणी झाली. त्यात ही नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com