श्रीरामपूर बाजार समितीवर अखेर प्रशासक नियुक्त

श्रीरामपूर बाजार समितीवर अखेर प्रशासक नियुक्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली असून सहायक निबंधक रुद्राक्ष यांनी प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालक मंडळाची मुदत 2019 मध्येच संपली होती. मात्र करोनामुळे संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली. त्यानंतरही काही अन्य कारणाने संचालक मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती.आता अखेर सहकार खात्याने निर्णय घेऊन ज्या बाजार समित्यांची मुदत संपलेली आहे तेथे प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश झाले आहेत.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधक रुद्राक्ष यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी पदाचा कार्यभार घेतला.

Related Stories

No stories found.