बिबट्याचा तरुणावर हल्ला; तरुण जखमी

गोवर्धन परिसरात भितीचे वातावरण
बिबट्याचा तरुणावर हल्ला; तरुण जखमी

नाऊर | वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन-नाऊर रस्त्यावर सोमवार रात्री ८ च्या सुमारास गोवर्धन येथील युवक ऋषीकेश राजेंद्र चव्हाण (वय १८ ) हा गावामध्ये डेअरीमध्ये दुध घालुन घरी परतत असतांना जगताप वस्तीजवळ अचानक बिबट्यानी गाडी वर झेप घेऊन जखमी करण्याची घटना घडली आहे.

बिबट्याचा तरुणावर हल्ला; तरुण जखमी
Video : 'कृषी संजीवनी' मोहिमेअंतर्गत कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतीवर जाऊन प्रात्यक्षिक

गेल्या दोन-अडीच महिन्यापूर्वी माळेवाडी-सराला गोवर्धन रोडवर अशाच पद्धतीने दुचाकी गाडी वर बिबट्याने दोघांना जखमी केले होते. त्यानंतर ग्रामस्थानी वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मात्र नेहमी प्रमाणे वनविभागाने टाळाटाळ केली. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा बिबट्याने चालत्या दुचाकी वर हल्ला केल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सध्या शेतामध्ये मशागती सह कपाशी लागवड सह इतर शेतीचे काम सुरु असुन बिबट्याच्या धाकाने मजुर काम करणारे धजावत नसल्याने शेतकरी व्यथित झाले आहे. काल दि. २२ रोजी वनविभागाच्या कर्मचारी यांनी संबधित तरूणाची व घटनेची पाहणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com