
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर शहरातील वार्ड नं. 1 मधील फातेमा हौसिंग सोसायटीमधील एका बंगल्यातून सव्वा लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली. घरातील मोलकरणीने ही चोरी केल्याचा संशय फिर्यादी महिलेने व्यक्त केला आहे.
याबाबत फैज्जान नूरमहंमद पठाण (वय 23, धंदा मोबाईल स्टोअर, रा. फातेमा हौसिंग सोसायटी, बंगला नं. डी-10, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 25 एप्रिल ते दि. 4 मे 2022 या दरम्यान आपल्या फातेमा हौसिंग सोसायटीमधील बंगल्यातील कपाटातून 1 लाख 30 हजार 880 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. सदर दागिने मोलकरीण खुर्शिद गनी सय्यद (वय 68, रा. बजरंगचौक, वार्ड. नं. 2, श्रीरामपूर) हिने चोरून नेल्याचा संशय फिर्यादी फैज्जान नूरमहंमद पठाण यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. 337/2022, भादंवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक बोरसे हे पुढील तपास करीत आहेत.