श्रीरामपूर शहर व तालुक्यात अवैध धंद्यांवर छापे

21 हजारांचा मुद्देमाल जप्त, 10 जणांना अटक; एलसीबीची कारवाई
श्रीरामपूर शहर व तालुक्यात अवैध धंद्यांवर छापे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मटका, दारू, जुगार अड्डे या अवैध धंद्यांवर छापे टाकून 21 हजार 865 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या छापेमारीतील 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 येथे देशी व विदेशी दारुची अवैध विक्री करताना आढळून आलेल्या समीर लतिफ पिंजारी (वय 24, रा. वॉर्ड नं.2, बजरंग चौक, नवी दिल्ली, श्रीरामपूर) यांच्याकडील देशी विदेशी दारुच्या बाटल्या हस्तगत करून त्याला अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मयूर दीपक गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली अहे.

शहरात रेल्वे स्टेशन समोर, आझाद हिंद जवळ एका टपरीच्या आडोशाला मटक्याचा अड्डा चालवित असताना रविंद्र भिमा चव्हाण (वय 49, रा. वॉर्ड. 7, सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) याला अटक करण्यात आली आहे. पोकॉ गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. डावखर रोडवरील योगेश हॉटेल शेजारी वॉर्ड नं. 5 येथे एका टपरीच्या आडोशाला प्रमोद बबन त्रिभुवन (वय 33, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर) याची अंगझडती घेतली असता कल्याण मटका खेळण्याचे साहित्य आढळले. पोलीस नाईक लक्ष्मण बोकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोकनगर फाटा निपाणी ते श्रीरामपूर रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये 3 ते 4 जण जुगार खेळताना आढळून आले. माधव नानासाहेब इंगळे (वय 30, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), सर्जेराव तुकाराम पगारे (वय 58, रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर), बहिरू रामकृष्ण गोरे (वय 29, रा. कारेगाव, ता. श्रीरामपूर) व अण्णासाहेब रंगनाथ इंगळे (वय 46, रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर) यांच्याकडून जुगारचे साहित्य व 5 हजार 340 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. पोना खोकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आझाद हिंद जवळ वॉर्ड 5 येथे एका टपरीच्या आडोशाला मटका खेळविताना आढळलेल्या इमान अहमद पठाण (वय 19, रा. सुभेदारवस्ती, वार्ड नं. 2, मशिदीसमोर) याच्याकडून 1 हजार 820 रुपयांची रोकड व मटक्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. गुन्हे शाखेने पोकॉ मलेश पाथरुड यांनी फिर्याद दिली आहे. बस स्टॅन्डसमोर योगेश हॉटेललगत बाजूला एका टपरीच्या आडोशाला उभा असलेल्या शकील अहमद जमील शहा (वय 32, रा. वॉर्ड नं. 2 सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून कल्याण मटक्याचे साहित्य व 1 हजार 650 रुपये हस्तगत करण्यात आले. पोकॉ कमलेश पाथरुट यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे.

शहरातील डावखर रोड योगेश हॉटेलशेजारी वॉर्ड नं. 6 येथे एका टपरीच्या आटोशाला उभा असलेल्या राहुल बबन पांडे (वय 43, रा. मोरगेवस्ती वॉर्ड 7, गणपती मंदिराशेजारी श्रीरामपूर) याची अंगझडती घेतली असता कल्याण मटक्याचे साहित्य व 2 हजार 130 रुपये रोख आढळले. याप्रकरणी पोकॉ मयूर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक सोपान गोरे, हेकॉ संदीप कचरू पवार, मनोज भीमराज गोसावी, पोना शंकर संपतराव चौधरी, लक्ष्मण विष्णू खोकले, मयूर दीपक गायकवाड, कमलेश हरिदास पाथरुट यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com