श्रीरामपूर शहरात अवैध हातभट्टी दारु अड्ड्यावर छापे

4 लाख 87 हजाराचा ऐवज हस्तगत
श्रीरामपूर शहरात अवैध हातभट्टी दारु अड्ड्यावर छापे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील गोंधवणी परिसरासह सरस्वती कॉलनी, कदमवस्ती, सुतगिरणी परीसरात दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून

दारु बनवण्याच्या रसायनासह एकूण 4 लाख 87 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर यांनी धडक कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अहमदनगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर विभागाचे प्र.उप अधीक्षक एस. एम. सराफ, अहमदनगरचे ब- विभागाचे निरीक्षक ए.बी.बनकर, कोपरगावचे निरीक्षक एस. के. कोल्हे, श्रीरामपूर विभागाचे निरीक्षक बी.बी. हुलगे, संगमनेर विभागाचे निरीक्षक आर. डी. वाजे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक पी.बी. आहिरराव यांनी काल दि. 25 डिेसेंबर 2020 रोजी सकाळी गोंधवणी परीसर, सरस्वती कॉलनी, कदमवस्ती, सुतगिरणी परीसरात छापे मारुन प्रभाकर किसन गायकवाड, माणिक सोमाजी शिंदे, कचरू गायकवाड (पसार) सर्व राहणार गोंधवणी तसेच उषा प्रभाकर काळे, चंद्रकांत शाम पवार, रा. कदमवस्ती, साधना मोहन काळे, वंदना संतोष काळे, रा. सूतगिरणी परिसर, इंदुबाई विष्णू जाधव, मीना लाला माने, रा. सरस्वती कॉलनी यांच्याकडून 80 लिटर स्पिरीट, 563 लिटर गावठी दारु, 12230 लिटर रसायन, 300 किलो काळा गुळ, 150 किलो नवसागर, 71 रसायन व भट्टी बॅरल, 33 प्लास्टीक कॅन व दोन दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य असा एकुण 4 लख 87, हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक, भरारी पथक क्र.2 विभाग तसेच निरीक्षक श्रीरामपुर विभाग, अहमदनगर करत आहेत.

या नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. सदर निर्मिती केंद्रांवर संयुक्त मोहिमेअंतर्गत सातत्याने कारवाया करण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियोजन केलेले आहे. सदरच्या संयुक्त मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या सहा विभागातील 35 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com