श्रीरामपुरात पाठीमागच्या दरवाजाने घरात प्रवेश करुन चोरी

श्रीरामपुरात पाठीमागच्या दरवाजाने घरात प्रवेश करुन चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील पूर्णवादनगरमधील एका महिलेच्या घराच्या पाठिमागील दरवाजा उचकटवून घरात प्रवेश करुन घरातील कानातील सोने व ऐवजाची चोरी केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, वार्ड नंबर 7, श्रीरामपूर या ठिकाणी राहणार्‍या महिला तृप्ती मच्छिंद्र आहेर यांच्या राहत्या घराच्या पाठी मागील दरवाजास हत्याराने उचकटवून दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर या दोन चोरट्यांनी आहेर यांच्या घरातील 02 ग्रॅ. सोन्याचे कानातले टॉप्स व त्यांच्या एक्टिवा गाडीची चावी तसेच घराच्या कुलपाची चावी अशा मालमत्तेची चोरी केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तृप्ती आहेर यानी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 365/2021 नुसार अज्ञात दोन चोरट्याविरुध्द भादंवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. वांढेकर हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com