श्रीरामपूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस

श्रीरामपूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील मटन मार्केट समोर झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगर परिषदेचे प्रभारी प्रकाश जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिक आपल्याकडे विनंती करतो की सदर ठिकाणी पाणी साचणार नाही याची दखल घेऊन रस्ता बनवून द्यावा. जेणेकरून सदर परिसरात पाणी साचणार नाही. किंवा साचणारे पाणी काढण्यासाठी गटारीची व्यवस्था करावी ही विनंती.

अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता नगर परिषदे समोर सदर भागातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा संतोष परदेशी व सौ. आशा संतोष परदेशी यांनी दिला आहे.

बेलापुरात बुरबर सुरू होती. तर उक्कलगाव, टाकळीभान, खोकर, भोकर, वडाळा महादेव, निपाणीवडगाव, हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडी, महांकाळवाडगाव व परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रोहीणी नक्षत्रात झालेल्या जेमतेम पावसावर पेरणीपूर्व मशागती उरकण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या पेरणीयोग्य पावसाने खरीप हंगामी सोयाबीन, बाजरी, मका व कडधान्याच्या पिकांची पेरणी करण्यात आली होती. पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने उगवण झालेली कोवळी पिके माना टाकू लागली होती. उगवण क्षमतेवरही त्याचा परीणाम झाला असल्याने दुबार पेरणीच्या संकटाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले होते.

गोंडेगांवात वीज पडून कालवड दगावली

गोंडेगाव (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील सुनील भिकाजी थोरात यांच्या घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली कालवड बांधलेली असताना काल सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान झालेल्या पावसात वीज पडून कालवड दगावली. सुदैवाने एक गाय चार कालवडी इतर जनावरे थोडक्यात बचावले. गावात घटनेची माहिती समजाताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com