श्रीरामपूर व हरेगावात देशी-विदेशी दारु दुकाने व गोदामांवर छापे

अंदाजे साडेपाच लाखाची दारु जप्त || पोलिसांनी पाळली गुप्तता
File Photo
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावच्या मतमाऊली यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण व दारुबंदी उत्पादन शुल्क पोलिसांच्या संयुक्तीक छाप्यात हरेगाव येथे दोन ठिकाणी तर श्रीरामपूर येथे एका ठिकाणी असे छापे टाकण्यात येवून सुमारे पाच ते साडेपाच लाखाची देशी-विदेशी दारु जप्त करण्यात आली. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना याची कोणतीही माहिती नाही तर दारुबंदी उत्पादन शुल्काकडूनही कारवाईबाबतची माहिती मिळू शकली नाही.

हरेगावच्या मतमाऊली यात्रेच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हरेगाव येथे दोन ठिकाणी देशी-विदेशी दारुच्या गोदामांवर छापा टाकला होता. यात एका ठिकाणाहून अंदाजे अडीच लाख तर दुसर्‍या ठिकाणाहून दीड लाख असा 4 लाखाचा माल पोलिसांनी हस्तगत केला. त्यानंतर हे पथक श्रीरामपूर शहराकडे वळून त्यांनी एका दुकानावर छापा टाकून अंदाजे दीड लाखाची देशी-विदेशी दारु जप्त केली. पोलिसांनी असा एकूण पाच ते साडे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र याबाबतची नोंद तालुक्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात आढळून आली नाही.

या छाप्याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना विचारली असता माहिती नाही असे नेहमीसारखी उत्तर देवून यातून आपली सुटका करुन घेतली.श्रीरामपूर येथील दारूबंदी खात्याचे इन्स्पेक्टर हुलगे हे नोटरीचेबल असल्याने कारवाई केली किंवा प्रकरण मिटले, हे समजू शकले नाही. या संदर्भात दारूबंदी खात्याचे पोलीस अधीक्षक तसेच श्रीरामपूर येथील अधिकारी माहिती का लपवतात? याबाबतचे गुढ मात्र कायम आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com