श्रीरामपुरात दीड लाखांचा गुटखा जप्त

मुलाला अटक, वडिल व अशोकनगरचा आरोपी पसार
श्रीरामपुरात दीड लाखांचा गुटखा जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहारतील सूतगिरणी फाट्यावर पोलिसांनी छापा टाकून दीड लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोेघे पसार झाले आहेत. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

राज्यात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री व साठवण करण्यास प्रतिबंध असताना श्रीरामपूर येथील सूतगिरणी फाटा येथे दुर्गानगर परिसरात मोईज पठाण व मुनिर पठाण हे त्यांच्या घरात गुटख्याची चोरून विनापरवाना बेकायदा विक्री व साठवण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यावरून त्यानी कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे , पोलीस नाईक शंकर संपतराव चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत पोपट जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रोहीत अंबादास येमुल, पोलीस कॉन्स्टेबल सागर अशोक ससाणे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण चिंधु खोकले व वाहन चालकपोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे राजेश नामदेव बडे यांना कळविले.

त्यानंतर पथकातील पोलिसांनी सूतगिरणी फाटा येथे जाऊन छापा टाकला असता तेथे एक व्यक्ती त्याच्या घरामध्ये हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा तसेच रॉयल 717 नाव असलेली तंबाखू पांढर्‍या रंगाच्या गोण्यामध्ये मिळून आली. त्याने मोईज मुनिर पठाण असे नाव सांगितले. झडती घेऊन हा गुटखा व तंबाखू कोण विक्री करतो याबाबत विचारपूस केली असता, हा पान मसाला गुटखा हा आपले वडील मुनिर अब्बास पठाण हे अशोकनगर येथील शाहरुख मजीदखान पठाण याच्याकडून घेतात व हे दोघे गुटखा साठवण करून विक्री करतात, असे त्याने सांगितले.

या ठिकाणी 1,20,000 रु. किमतीच्या पांढर्‍या रंगाच्या 10 गोण्यांमध्ये एकूण 1000 हिरा पान मसाला गुटखा कंपनीचे पुडे, प्रत्येकी किंमत 120 रु. तसेच 30,000 किमतीचे निळया रंगाचे 10 गोण्यांमध्ये एकूण 1000 रॉयल 717 तंबाखूचे पुडे प्रत्येकी किंमत 30 रु. पुडा प्रमाणे असा 1,50,000 रु किमतीचा हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले व पुढील कारवाई कामी सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांना कळवून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोईज मुनिर पठाण (वय 22, रा. सूत गिरणी फाटा, दुर्गानगर) त्याचे वडील मुनिर अब्बास पठाण (रा. सुतगिरणी श्रीरामपूर,) व शाहरुख मजीदखान पठाण (रा अशोकनगर ता. श्रीरामपूर यांच्याविरुध्द भा.द.वि. कलम 328, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करम्यात आला आहे. मोईज मुनिर पठाण याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला प्रथम पोलीस कोठडी व काल न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.