श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात जिजामाता चौक परिसरातील एका घरात अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकाने छापा टाकून

48 हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा पकडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या पथकास खबर मिळाल्यानुसार त्यांनी आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या पोलीस पथकाच्या सहाय्याने शहरातील वॉर्ड नं. 3 स्टेट बँक रोड, जिजामाता चौक परिसरातील घर क्र. 7608 येथे छापा टाकला.

त्यानुसार या ठिकाणाहून 47,450 रुपये किंमतीचा हिरा पानमसाला व रॉयल 717 असा ऐवज मिळून आला. यावेळी घटनास्थळी आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी यांनी भेट देऊन पहाणी केली तसेच माहिती घेतली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 2224/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक श्री. खराडे हे पुढील तपास करीत आहेत.