श्रीरामपुरात दीड लाखाचा गुटखा पकडला
सार्वमत

श्रीरामपुरात दीड लाखाचा गुटखा पकडला

नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने मारला छापा

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

शहरातील झिंरंगेनगर, वॉर्ड नं. 3 मध्ये नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून बेकायदेशीररित्या बाळगुन ठेवलेला वेगवेगळ्या कंपन्याचा दीड लाखाचा गुटखा पकडला. याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभेदारवस्ती, वॉर्ड नं. 2 मधील काझीबाबा रोडवर राहणारा वसीम उस्मान सय्यद याने वॉर्ड नं. 3 मधील झिरंगे नगर या भागात एका ठिकाणे बेकायदेशीररित्या गुटखा बाळगला असल्याची माहिती अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनास माहिती मिळाली त्यानुसार काल त्यांच्या पथकाने सदरच्या ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात या पथकाने 1 लाख 20 हजाराचा हिरा गुटखा, 30 हजार रुपये किंमतीचा 1 हजार पॅकेट असा दीड लाखाचा पान मसाला तंबाखू मिळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने हा सर्व माल जप्त केला आहे.

याप्रकरणी अन्न सुरक्षाचे अधिकारी अन्न व औषध प्रशासनाचे निलेश सुभाष मसारे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 1293/2020 प्रमाणे वसीम उस्मान सय्यद याचेविरुध्द भादंवि कलम 188, 272, 273, 328 सह अन्न सुरक्षा व माने कायदा कलम 26 (2) (आयव्ही), 27 (3), डी, 27 (3), (इ), 30 (2), (ए) 3, (1) झेडझेड (आय), 3 (1), (झेडझेड( (व्ही), 69 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com