किराणा दुकानदारास धमकावल्या प्रकरणी आरोपी जेरबंद
सार्वमत

किराणा दुकानदारास धमकावल्या प्रकरणी आरोपी जेरबंद

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील वाकडी येथील किराणा दुकान व्यावसायिकास मारहाण करुन धमकावल्याप्रकरणातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून काल त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांस दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वाकडी येथील दत्तात्रय भाऊसाहेब गाडेकर लॉकडाउन असल्याकारणाने दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना येथे आरोपी उमेश भाऊसाहेब कापसे, राजेंद्र सूर्यभान सदाफळ व नानासाहेब सखाराम सदाफळ यांनी फिर्यादीला पाण्याची बाटली व वेफर्स मागितले त्यावरून फिर्यादी दुकानदार दत्तात्रय गाडेकर यांनी नकार देतास त्यांना सदर आरोपी यांनी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली व लाकडी दांडक्याने मारहाण केली.

यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश गोरे यांनी घटनेचा तपास करून सदर आरोपी यांना जेरबंद करून न्यायालयात हजर केले.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कस्टडी तसेच रिमांड घेण्याचा आदेश दिला आहे याकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश गोरे, यांना पो. कॉ. कराळे पो. कॉ. योगेश राऊत यांचे सहकार्य लाभले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com